Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवा वॉरियर्स मिलाप करंडक 2023-क्वॉयझिटीक किग, अजय शर्माने जिंकला

चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे 11 , जानेवारी :-  भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरीयर्सच्या वतीने आयोजित ‘मिलाप करंडक २०२३’, आंतर महाविद्यालयीन एकल / समूह नृत्य स्पर्धेचे विजेतेपद एकल विभागात अजय शर्मा (नगीनदास खंडवाल महाविद्यालय) व समूह नृत्य विभागात क्वॉयझिटीक किग (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय) यांनी पटकावले.

निकाल :
एकल विभाग :
प्रथम – अजय शर्मा (नगीनदास खंडवाल महाविद्यालय)
द्वितीय – घनश्याम सोनवले (सेंट बोना महाविद्यालय)
तृतीय – प्रतीक्षा लोंढे, प्रदीप गुप्ता (आबासाहेब गरवारे महाविद्यालय)

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समूह नृत्य विभाग:
प्रथम – क्वॉयझिटीक किग (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय)
द्वितीय – एन्डलेस क्लेव (बी.एम.सी.सी. महाविद्यालय) व नृत्यांजली ग्रुप (एम. आय. टी. महाविद्यालय)
तृतीय – आनंद ब्रॉडवे क्लेव (गरवारे महाविद्यालय) व बी.डी.एस. क्लेव (के. पी. बी. महाविद्यालय)

उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे दिवसभर रंगलेल्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या. तरुणाईच्या जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत वैयक्तिक गटात जणांनी ५५, तर सांघिक गटात १५ ग्रुप्सनी भाग घेतला होता. पारंपारिक कथक, लावणीपासून पाश्चात्य नृत्यातील ब्रेक डान्स आदी प्रकारात विद्यार्थ्यांनी दाखवलेले पदलालित्य वाखाण्याजोगे होते. नृत्य स्पर्धकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाजयुमो युवा वॉरीयर्सचा हा महोत्सव तरुणांमध्ये नवा उत्साह संचारणारा ठरेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजयुमोचे कार्य कौतुकास्पद असून गेले अनेक वर्ष प्रत्येक युवा पदाधिकारी विविध क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे. भाजपाचे व वॉरिअर्स तरुणांपर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा आणि केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न युवा वॉरीयर्सच्या माध्यमातून करणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे बक्षिस वितरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या सोहळ्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, अजय खेडेकर, दिपक पोटे, गणेश घोष, पुनीत जोशी, संयोजक सुशील मेंगडे, अमृत मारणे, प्रा. सचिन जायभाये, गणेश कुटे, भैरवी वाघ, सुजित थिटे, प्रिया पवार, अक्षय नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत नृत्याच्या माध्यमातून भाजयुमो युवा वॉरीयर्सच्या वतीने चांगला सामाजिक संदेश दिला गेला. अशा कार्यक्रमामुळे युवकांमधील कलागुणांना वाव मिळेल व अनेक चांगले कलाकार घडतील, अनेक तरुणांना ह्या व्यासपीठामुळे भविष्यात मोठे कलावंत होता येईल, असे मत पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. संयोजक सुशील मेंगडे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरीयर्सच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध क्षेत्रात काम करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या युवकांना नृत्यासाठी एक मंच उपलब्ध व्हावा यासाठी युवा वॉरीयर्स तीने आंतरमहाविद्यालयीन एकल / समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ”

स्पर्धा यशस्वीतेसाठी पुणे शहर भाजयुमो सरचिटणीस ओंकार केदारी आणि चिटणीस अजिक्य साळुंके यांनी परिश्रम घेतले. आर जे बंड्या यांनी सूत्र संचालन केले ओंकार केदारी यांनी आभार मानले.

हे देखील वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.