Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी तहसीलदारांशी विविध समस्ये संदर्भात संवाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर:-  जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अहेरी तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी समोर येताच आज प्रत्यक्ष अहेरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार ओंकार ओतरी यांच्याशी तालुक्यातील विविध समस्ये संदर्भात संवाद करणायत आला. प्रथमता तालुक्यातील महाराष्ट्राच्या प्राणहिता नदीकाटी व सीमेवर असलेला देवलमरी गाव आहे. आजही विविध समस्यांनी ग्रासलेले असून या ठिकाणी प्राणहिता नदी जवळ असल्याने येथील स्थानिक कोळीबांधव मासे पकडून त्याच मिळालेल्या मिळकतीतून आपले उदरनिर्वाह करीत आहेत.

मात्र या वर्षी तेलंगाणा राज्यातील तलाई गावातील कोळी बांधव प्राणहिता नदीमध्ये स्वताचे जाळे टाकून स्थानिक कोळीबांधवांना विरोध करून हाकलून लावत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. शेवटी कंटाळून आज देवलमरी येतील सर्व कोळीबांधव अजय कंकडालवार यांची भेट घेवुन समस्येचे कथन करण्यात आले. लगेच कुठलाही वेळ वाया न जाऊ देता स्थानिक कोळीबांधवांना सोबत घेऊन तहसील कार्यालय गाठून तहसीलदार ओमकार ओतारी यांच्याशी सर्व समक्ष चर्चा करण्यात आली. त्यानंतर अनेक महिन्यापासून नागरिकांचे घराचे बांधकाम रेतीमुळे थांबले असल्याने रेतीघाट लिलाव, कुटुंब अर्थसहाय्य, श्रावणबाळ अनुदान अशा विविध समस्ये संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी. त्यावर तहसीलदार यांनी आपण सांगितलेल्या सर्वच समस्येची दखल घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

         यावेळी अहेरी पं.स. चे सभापती भास्कर तलांडे, जि. प. सदस्या सुनीताताई कुसनाके, किस्टापूर ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमूले, देवलमरी येतील गंगाराम तोकला, सत्यम तोकला, गोंगलू तोकला, रवि तोकला, गणेश तोकला,सत्यम मंचर्ल्ला,आदि मोठ्या संखेत उपस्थित होते.

Comments are closed.