Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना”  ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे.

केंद्र सरकार  सामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. सदर योजनांच्या माध्यमातून गरजू व गरीब लोकांना आर्थिक मदत केली जात आहे. यातीलच एक योजना म्हणजे            ” पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना”. केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या शासकीय योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो आत्तापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते जमा झाले असून  लवकरत 19 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होणार आहे. या योजनेंतर्गत सुमारे 13 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. शासकीय योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो. पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात रिलीज झाला होता. तो  फेब्रुवारीमध्ये 4 महिने पूर्ण करणार आहे. त्यामुळे पीएम किसानचा पुढचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी केलेले नाही. त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन

भात व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

नागपुरात किमान तापमानाचा पारा 8.8 अंशावर !

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.