Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना, पण नेमकी कशी होणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 01 फेब्रुवारी:– देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 3,726 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी देशाची जनगणना होणार असून पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात देशावासियांचं सर्व रेकॉर्ड संरक्षित करण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोबाईल फोन अॅप्लिकेशनद्वारे जनगणना करण्याची मागणी केली होती. मोबाईल फोन अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केल्यास आपण डिजिटल जनगणनेच्या दिशेने वाटचाल करू, असं शहा म्हणाले होते.

अशी होणार जनगणना

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डिजिटल जनगणनेसाठी केंद्र सरकार 16 भाषांमध्ये अॅप तयार करणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्यात तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची माहिती भरावी लागणार आहे. त्यांचे वय आणि लिंग याची माहिती भरावी लागणार आहे. त्याशिवाय या अॅपमध्ये आणखी काय काय माहिती भरायची याबाबतच्या सूचना भारत सरकारकडून जारी करण्यात येईल. त्यानुसार प्रत्येकाला घरी बसूनच आपली नावं नोंदवता येणार आहेत.

16 भाषेत अॅप तयार करणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहा यांनी डिजिटल जनगणनेसाठी मोबाईल अॅप विकसित करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे जनतेला त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती स्वत: भरता येईल. 12,000 कोटी रुपये खर्च करून 16 भाषेत हे अॅप तयार केलं जाणार असल्याचं शहा यांनी सांगितलं होतं.

देशाची लोकसंख्या किती

2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या 121 कोटी आहे. केंद्र सरकारने मार्च 2020मध्ये घोषणा करून मार्च 2021मध्ये जनगणना करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्रीय गृहमंत्रालयाने जनगणनेसाठी एक नोटीफिकेशन जारीही केलं होतं. संविधानाच्या अनुच्छेद 3 अंतर्गत जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं.

Comments are closed.