Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित

पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली १२ एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

न्यायालयाचा संपूर्ण परिसर आणि कोर्ट रुम सध्या सॅनिटाइज केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिरानं होणार आहे. एका न्यायाधीशांनी सांगितलं की, “माझ्या बर्‍याच कर्मचार्‍यांना आणि लिपिकांनी कोरोनाची लागण झाली आहे.” काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता ते बरे झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार मागच्या आठवड्यात प्रचंड वेगानं झाला आहे. तर, रविवारी नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एका दिवसात १,६९,८९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद  झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, देशात रविवारी ९०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.