Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी- सत्संगात अचानक चेंगराचेंगरी मध्ये 75 भाविकांचा मृत्यू.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात हा प्रकार. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

उत्तर प्रदेशातील हाथरस, 03 जुले- उत्तर प्रदेशातील मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात भोलेबाबाच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक पोहचले होते. या कार्यक्रम दरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली. यात काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मयतांचा आकडा 27-28 वर पोहचला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दुर्घटनेने उत्तर प्रदेश हादरले. सरकारी यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे. गंभीर असलेल्या भाविकांना मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केली. याप्रकरणात जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील काही स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचे समोर येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली. चेंगराचेंगरी होण्यामागील कारण काय याचा तपास करण्यात येत आहे. सध्या गंभीर भाविकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.