Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सॅनिटायझर पिऊन नशा करणारे ३ भावांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

भोपाळमध्ये लॉकडाऊनमध्ये व्यसन पूर्ण करण्यासाठी रविवारी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भोपाळ डेस्क 25 मार्च:- मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये दारूच्या व्यसनाधीन झालेल्या तीन भावांचा सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये सध्या लॉकडाऊनसुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दारू विकत घेऊ शकत नव्हते, म्हणून तिघांनी ही त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी रविवारी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला. त्यामुळे त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृत व्यक्ति परवत अहिरवार आणि भाऊ भूरा अहिरवार हे दोघेही कामगार होते, तर राम प्रसाद हा पेन्टर होता. हे तिघेही विवाहित होते, परंतू ते आपल्या कुटूंबापासून दूरच रहात होते. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रविवारी या तिघांनी 5 लिटर सॅनिटायझरचा कॅन विकत घेतला आणि त्यातील निम्म्या सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर सॅनिटायझर प्यायल्यानंतर लवकरच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या दिवशी खराब परिस्थिती असतानाही दारुच्या हव्यासापोटी त्यांनी सोमवारी पुन्हा सॅनिटायझरचे सेवन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.