Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई डेस्क, दि. ४ एप्रिल: संपूर्ण जगभरात कोरोनानं हैदोस घातला आहे. देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच बॉलिवूडलाही कोरोनानं ग्रासलं आहे. अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेते गोविंदा यांनी दिली आहे. तसेच माझी प्रकृती ठिक असून मी सध्या होम क्वॉरंटाईन आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशी विनंतीही गोविंदा यांनी दिली. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बॉलिवूडमधील खिलाडी‘ अक्षय कुमारला कोरोनाची लागण

कोरोनाच्या विळख्यात आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. अक्षय सध्या होम क्वॉरंटाईन आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत सांगितलं की, आज सकाळी माझी कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.