Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला, आरोपी अटकेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

रॅलीनंतर हॉटेलमध्ये जाताना कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कांचीपूरम डेस्क 15 मार्च:- तामिळनाडूमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मक्कल निधी मय्यमचे प्रमुख अभिनेते कमल हासन यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून हासन निवडणूक लढवणार आहेत. अशात आता हासन यांच्या गाडीवर हल्ला  करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार, हासन यांना दुखापत झालेली नाही, मात्र या हल्ल्यात गाडीचं भरपूर नुकसान झालं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कमल हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी दारुच्या नशेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी आरोपीला मारहाण केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केलं. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाला 2 मे रोजी लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.