Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यानी पोलिसांच्या वाहनाला स्फोटकाच्या हल्ल्यात उडविले 9 पोलीस जवान जागीच शहीद ; तर सात गंभीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बिजापूर : नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या अगदी २० किमी अंतरावर बिजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटू रोडवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सोमवारी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षल्यानी स्फोटक यंत्राने उडवलं. या घटनेत आठ पोलीसासह एक चालक असे एकूण ९ जण शहीद झाले आहेत.

स्थानिक छत्तीसगड राज्यातील पोलीस ५ जानेवारी रोजी (रविवारी) नक्षलविरोधी अभियान राबवून परतत एका वाहनात २० जवान जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात आठ जवान आणि चालकासह एकूण नऊ जवान शहीद झाले असून सात जवान गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्तीसगड राज्याच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत दोन दिवसाआधी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले होते. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत, त्यानंतर हा हल्ला करण्यात आला हे विशेष.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.