Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिहारच्या विजयाचे भाजपातर्फे राजधानी दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

वृत्तसंस्था: नवी दिल्ली

बिहारमध्ये एनडीएनं विजय मिळवल्यामुळे दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्याकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. बिहारमधील विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आहे. बिहारमधील यशाचं भाजपा कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅली काढण्यात आली असून, त्या रॅलीमध्येही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.     

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नद्डा यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.  र्यकर्त्यांनी फुलं देऊन स्वागत केलं आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले. यामध्ये नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या (JDU) अवघ्या 43 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा राहील, हे स्पष्ट झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.