Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात

भारत बायोटेकने दिली माहिती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. २४ मे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे देशात आतापासून तयारी सुरु झाली आहे. अश्यातच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. भारतात जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे. भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही ७० कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला १५०० कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.

आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा डॉ. राचेस एल्ला यांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथ यांनी भारतामध्ये तयार होत असलेली नेझल व्हॅक्सीन गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांना लस देणे आणखी सोपे होईल. लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत आपल्याला लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होईल, असे सौम्या स्वामिनाथ यांनी म्हटले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

ब्लॅक फंगसचा धोका नेमका कोणत्या रुग्णांना?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.