Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर UPSCने यांची उमेदवारी रद्द

भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्ली, 31 जुले- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मोठा दणका मिळाला आहे. UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे.

पूजा खेडकर यांनी यूपीएससीची दिशाभूल करुन आयपीएस पद मिळवलं होतं. पण प्रशिक्षणार्थी म्हणून पोस्ट मिळाल्यावर त्यांनी आपल्या वागणुकीतून आपलं पद घालवलं आहे. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमलादेखील बदली करण्यात आली होती. पण नंतर त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्यानंतर यूपीएससीने त्यांना लालबहादूर शास्त्री अकादमी येथे परत बोलावलं होतं. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच चौकशी देखील केली होती. या प्रकरणी पूजा खेडकर यांना म्हणणं मांडण्यासाठी यूपीएससीने तारीख देखील वाढवून दिली होती. पण पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या नोटीसला उत्तर दिलं नाही. त्यामुळे अखेर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीचा माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून त्यांनी परीक्षा पास केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता. आता आयोगाने थेट कारवाई देखील केली आहे.

यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या २००९ ते २०२३ या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे. खेडकर यांना नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.