Corona Vaccine:- जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी भारत सज्ज
लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 12 जानेवारी :– भारतात कोरोनावरील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील नागरिक आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 16 मंत्रालयांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत केलेल्या दोन लसी भारतात तयार केल्या गेल्या आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला लसीकरणाचा अनुभव, दुर्गम भागात पोहोचण्याची व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 1 कोटी 10 लाख डोस तयार करण्याची ऑर्डर
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे की, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. यादरम्यान केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीचे 1 कोटी 10 लाख डोस तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. सीरमने दिलेल्या माहितीनुसार एका डोसची किंमत 200 रुपये असेल
Comments are closed.