Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिपी विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाची खा. विनायक राऊताकडून पहाणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • डिजीसीआयच्या निकषांनुसार धावपट्टीचे काम सुरू.
  • आयआरबी कंपनीला अंतिम इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १९ एप्रिल: बहुचर्चित चिपी विमानतळाच धावपट्टीच काम डिजीसीएच्या निकषांप्रमाणे होत नसल्याने सध्या काम रखडलेल्या स्थितीतच सुरू आहे. आता आयारबीला शेवटची वाॅर्निग दिलेली असून जर डिजीसीएच्या सुचनेप्रमाणे विमानतळाच्या धावपट्टीचे  काम पूर्ण झालं नाही तर एमआयडीसीला चिपी विमानतळ आपल्या ताब्यात घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही माञ कोणत्याही परिस्थितीत धावपट्टीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड केली जाणार नसल्याचं म्हणत आपण आयआरबी कंपनीला शेवटचा इशारा दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चिपी विमानतळास खासदार विनायक राऊत यांनी भेट देत चिपी विमानतळाच्या धावपट्टीची पहाणी केली सध्या धावपट्टीचे सरफेसचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे यावेळी आय आर बी चे अधिकारी राजेश लोणकर उपस्थित होते.

  चिपी विमातळावरून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करीत उदघटनाचा मुहूर्त आघाडी सरकारला साधताना अनेक अडचणी येत आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय डिजीसीआय च्या पथकाने चिपी विमानतळाच्या धावपट्टीची पहाणी केली होती त्यावेळी विमानतळ धावपट्टीचे काम अयोग्य असल्याचा अहवाल डिजीसीआयच्या पथकाने दिला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आता नव्याने पुन्हा एकदा आय आर बी कंपनीने धावपटीचे काम सुरू केले आहे त्याचीच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पहाणी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.