Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीजापुरमध्ये सुरक्षा दल आणि माओवादी भीषण चकमक; सहा माओवादी ठार, ऑटोमॅटिक शस्त्रसाठा जप्त..

राष्ट्रीय उद्यान परिसरात दुपारीपर्यंत चकमक सुरू; डीआरजी, एसटीएफ आणि दंतेवाडा दलाचे संयुक्त अभियान...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

बीजापुर/गडचिरोली : छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात आज (११ नोव्हेंबर) सकाळपासून सुरू झालेल्या सुरक्षा दल आणि माओवादी दरम्यानच्या भीषण चकमकीत आतापर्यंत सहा माओवादी ठार झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून ऑटोमॅटिक शस्त्रे, इंसास रायफल, स्टेनगन, .303 रायफल, तसेच मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि माओवादी प्रचारसामग्री जप्त करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांना या परिसरात माओवादी तळ असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर डीआरजी बीजापुर, डीआरजी दंतेवाडा आणि एसटीएफच्या संयुक्त पथकांनी सकाळी सर्च ऑपरेशन सुरू केले. सुमारे सकाळी १० वाजल्यापासून अधूनमधून गोळीबार सुरू असून, दुपारपर्यंत तीव्र चकमक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीजापुर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, “सुरक्षादलांचे संयुक्त अभियान सुरू असून, आतापर्यंत सहा माओवादींचे मृतदेह सापडले आहेत. माओवादींकडून वापरली गेलेली ऑटोमॅटिक शस्त्रे, स्फोटके आणि इतर सामग्री घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे.”

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, “ही कारवाई सुरक्षा दलांसाठी एक निर्णायक टप्पा आहे. गेल्या काही महिन्यांत माओवादी संघटना नेतृत्वहीन व दिशाहीन स्थितीत आहे. या यशस्वी ऑपरेशनमुळे बस्तर पट्ट्यातील उरलेले माओवादी तळ आता पूर्णतः डळमळीत झाले आहेत.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अभियानासाठी डीआरजी, एसटीएफ, बस्तर फायटर्स, सीआरपीएफ आणि सीएएफच्या अतिरिक्त तुकड्या परिसरात पाठवण्यात आल्या आहेत. फरार माओवादींची घेराबंदी सुरू असून, ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत ठिकाणाचे तपशील सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अभियानानंतर सविस्तर अहवाल स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.