Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मिल्खा सिंग कोरोनाविरुद्ध अखेर हरले, रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन

पत्नीच्या मृत्यूनंतर काही दिवसातच सोडला प्राण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंडीगड, 19 जून: भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.

17 मे रोजी मिल्खा सिंग यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, त्यानंतर 31 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात कोविड नियमांचं पालन करीत आराम करीत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधानाने आपण एक महान खेळाडू गमावला आहे ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्यासोबतचा एक जुना फोटोही ट्विट केला आहे.

milkha shing in hospital

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंतप्रधानांनी ट्विट करत पुढे म्हटलं, मी काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्यासोबत बोललो होतो. ते आमचे शेवटचे संभाषण ठरेल हे माहिती नव्हते. अनेक नवोदित अॅथलेटिक्स हे मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील प्रवासातून प्रेरणा मिळवतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.