Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : जिल्हयात  दारूबंदी तसेच गुटखाबंदी असूनही  जिल्ह्याच्या दक्षिण भागात गांजा व तंबाखूची तस्करी मोठ्या जोमाने सुरू आहे.

नवीन पिढीतील अनेक युवक दारू व गुटख्याचे  व्यसनाला बळी पडत आहेत. राज्यात जरी बंदी असली तरी  शेजारच्या छत्तीसगड व तेलंगाना  राज्यातून अहेरी व परिसरात गांजा, बनावट तंबाखू आणून विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याने यामागे नेमका कोणाचा आश्रय आहे,  असा प्रश्न निर्माण  होत आहे. भामरागड व अहेरीला ही  छत्तीसगड राज्याचा काही भाग लागून आहे.  यासोबतच तेलंगणा राज्याची सीमा सिरोंचाला चिकटून आहे. गडचिरोलीत दारुबंदी असल्याने अनेक जण व्यसन  भागविण्यासाठी पर्याय म्हणून गांजा व तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. अनेकांना खर्रा खाण्याची लत आहे. खर्रासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूसह गांजा पुरविणाऱ्या टोळ्या या भागात सक्रिय झालेल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंतरराज्यातील  तस्करांशी स्थानिकांचे थेट कनेक्शन असल्याने  या आडून बनावट तंबाखूही मोठ्या प्रमाणात येते. आंतरराज्य तपासणी ‘माल’ योग्य ठिकाणी कसा पोहोचेल, याची व्यवस्था केली जाते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत गांजा व तंबाखू तस्करांवरील पोलिसांच्या कारवाया देखील थंडावल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनासमोर या भागात नक्षल्यांचे सर्वांत मोठे आव्हान आहे.  ही संधी साधून अनेक नवे तस्कर या धंद्यात उतरल्याचे दिसून येत आहे.

हे पण पहा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली शहरात अमित शहा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद..

आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

 

Comments are closed.