Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इथे चक्क! ट्रक चालकाला हेल्मेट न घातल्याने केला दंड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १८ मार्च: हेल्मेट न घातल्याबद्दल मोटारसायकल स्वारांकडून सहसा दंड आकारण्याचे आपण ऐकले आणि अनुभवले असालच. परंतु ट्रकचालकाचे हेल्मेट न घातलेले चालन तुम्ही कधी ऐकले आहे काय? असाच काही प्रकार ओडिशाच्या गंजम येथे घडला आहे. हेल्मेट न घातल्याबद्दल एका ट्रक चालकाला चक्क एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसे पाहता ट्रक चालवितांना हेल्मेट सक्तीचे नाही. मात्र तरीही असा प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 ट्रकचालकाने सांगितले की, ट्रकचे परमिट कालबाह्य झाल असल्याने ते आरटीओच्या कार्यालयात वाहन परवाना फी भरण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांचा नावावर आधीच तीन दंड असल्याचे सांगण्यात आले. या दंडाची रक्कम भरल्यानंतर जेव्हा पावती फाडण्यात आली त्यात हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. गेल्या वर्षी 24 डिसेंबरला हे चालान देण्यात आले होते. या वाहनधारकाचे नाव प्रमोदकुमार स्वैन असून गंजममधील जी जगन्नाथपूर येथील रहिवासी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.