Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयसीसी करणार सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये बदल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 04 नोव्हेंबर :- टी-20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आहे. वल्र्डकप चा फायनल सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले आहेत. अशातच सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय येईल या भीतीने आयसीसीने नियम केला आहे. पावसामुळे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाही, याचा विचार करून वर्ल्डकपच्या सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यात निकाल लावण्यासाठी दोन्ही डावात प्रत्येकी 10 ओव्हर टाकणे बंधनकारक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता कोणत्याही सामन्यामध्ये 10 ओव्हर्स पूर्ण झाले नसतील तर सामन्याचा निकाल नाही लागणार. या शिवाय एखादा सामना टाय झाला, पाउस आला किंवा इतर कारणांमुळे सामना नियोजित दिवशी न खेळल्या गेल्यावर तर हे महत्वाचे सामने राखीव दिवशी खेळवले जातील. मात्र, ऑफिशियल्सने त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यावर जोर द्यावा. भलेही त्या दिवशी 10-10 ओव्हरचा खेळ होईल.

जर सामना नियोजित वेळेवर सुरू झाला आणि सामना सुरू असतांनाच पाउस आला किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली, ज्यावेळी सामना पुन्हा सुरू होने शक्य नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता तिथूनच पुढे सुरू होईल. आयसीसीचा हा निर्णय फॅन्स आणि क्रिकेट टीम दोघांसाठीही चांगला ठरू शकतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.