Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयसीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • बारावीची परीक्षा लांबणीवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. २० एप्रिल: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई  बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची परीक्षा मात्र रद्द करण्यात आली नाही. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे आयसीएसई  बोर्डाने म्हटले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. बोर्डाच्या विविध परीक्षांच्या आयोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असेल असे  पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हिताचा केंद्र सरकार विचार करेल अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही आणि त्यांचं वर्ष फुकट जाणार नाही याची काळजी घेतली जाईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा ४ मे ते १४ जून कालावधीत होणार होत्या. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १ जून २०२१ रोजी परिस्थितीचा अंदाज घेऊन बोर्ड निर्णय घेईल. संबंधित निर्णयाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी कल्पना देण्यात येईल असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.