Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अरबी समुद्रात ‘बार्ज P- 305’ वरील रेस्क्यू ऑपरेशन थरार सुरूच

अद्याप 89 कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 19 मे:-  बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात ही बार्ज तौक्ते चक्रीवादळादरम्यान बुडली, या बार्जवर एकूण 273 कर्मचारी होते. यापैकी 184 जणांना नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले आहे. जहाजावरून 14 मृतदेहही आणण्यात आले आहेत. ONGC चे अनेक कर्मचारी अजूनही बेपत्ता असून नौदलाची शोध मोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप 89 कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या  आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी GAL Constructor बार्जवर अडकलेल्या 184 कर्मचाऱ्यांचीही सहीसलामत सुटका केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

INS कोचीवरुन 125 जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर 65 जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.

हे पण वाचा :- गडचिरोली जंगलातील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.