Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली, दि. ६ जानेवारी : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी तथा प्र.उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी पत्रकारदिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पाली त्रिपिटक भाषांतर प्रकल्पासाठी बार्टीने तज्ज्ञ समिती गठीत करावी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.