Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मात्र याच कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत तर 10 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे.  प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री  1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या  आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रुग्णवाहिका चालकांनी चेंगराचेंगरी झाली झाल्याची माहिती आहे. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं  आवाहन केलं आहे संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची तर 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.