Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संक्रांत साजरी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकाचा भीषण अपघातात 11 ठार

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला.

17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कर्नाटक डेस्क 15 जानेवारी :– मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी 17 महिला गोव्याला निघाल्या असताना  धारवाड राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात 11 जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावर मृत प्रवाशांचा एकच आक्रोश मन सुन्न करणारा होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकूण 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. अपघातात चार महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.

Comments are closed.