Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजपासून देशात फास्टॅग बंधनकारक

Get real time updates directly on you device, subscribe now.

फास्टॅग नसलेल्या वाहनांना त्या वाहन प्रकारासाठी निर्धारित टोलपेक्षा दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आजपासून संपूर्ण देशभरात फास्टॅग बंधनकारक केले आहेत. ते नसल्यास दुप्पट दंडाची देखील तरतूद केली आहे. नितीन गडकरी यांनी १५/१६ फेब्रुवारी २०२१च्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गांवरील सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिका म्हणून घोषित केल्या जाणार आहेत. त्यामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांना त्या वाहन प्रकारासाठी निर्धारित टोलपेक्षा दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फास्टॅग ही स्वयंचलित टोल वसूल करणारी यंत्रणा आहे. आजपासून देशभरात ही यंत्रणा बंधनकारक असणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील पैशांची देवाण-घेवाण करण्यात जाणारा वेळ वाचणार आहे. फास्टॅग करिता टोल नाक्यावर स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. मात्र यात फास्टॅग नसलेली वाहने देखील जात असत. यापुढे असे केल्यास दुप्पट दराने टोल वसुली केली जाणार आहे.

फास्टॅग नसताना एखादे वाहन त्या मार्गिकेमध्ये गेल्यास त्या वाहन प्रकारासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा दुप्पट टोल वसुली केली जाईल असे, केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. फास्टॅग हा वाहनांवर लावण्यात येणारा एक स्टिकर आहे. याच्यामार्फत टोल नाक्यावर थेट बँक अकाऊंटमधून टोल भरला जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत आणि इंधनाच्या वापरात मोठी बचत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.