नक्षलवाद्यांकडून बीजापूर-तेलंगणा सीमावर्ती भागातील लष्करी मोहीम तात्काळ थांबवण्याची विनंती. शांतता चर्चेसाठी पुढे येण्याचे केले आवाहन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सुकमा: उत्तर पश्चिम बस्तर विभागातील नक्षल चळवळीचे प्रभारी रूपेश यांनी एका प्रेस नोटद्वारे राज्य आणि केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांनी बीजापूर व तेलंगणा सीमावर्ती भागात सुरु असलेल्या मोठ्या लष्करी मोहिमेची तात्काळ समाप्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी शांतता प्रक्रियेसाठी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे.
याआधीही राज्य व केंद्र सरकारने माओवादी नेत्यांना अनेक वेळा हिंसा थांबवून, शस्त्र खाली ठेवून शांततेच्या मार्गावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र, माओवादी नेते या आवाहनांकडे दुर्लक्ष करीत, सामान्य नागरिकांना पोलीसांचे खबरी म्हणून ठरवून त्यांची निर्दयपणे हत्या करत राहिले. त्यांनी ‘जनताना सरकार’च्या नावाखाली गावकऱ्यांवर भयानक अत्याचार केले. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये त्यांच्या दहशतीत अजिबात घट झाली नव्हती.
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. सुरक्षा दलांची कडक मोहीम, गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली जनजागृती, आणि विकासाच्या योजनांचा प्रभाव यामुळे आता माओवादी नेतृत्वाला शांततेच्या मार्गाने यावे लागणार आहे. त्यांच्या या मागणीवर शासन कसा प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.