Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Social media ची लगाम आता मोदी सरकारच्या हातात, तीन महिन्यात अंमलबजावणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 25 फेब्रुवारी:– सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जातात. त्यामुळे आता केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलली आहेत. केंद्रानं सोशल मीडियाची लगाम आता आपल्या हातात घेतली आहे. सोशल मीडियाबाबत केंद्र सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी हे नियम बंधनकारक असणार आहेत.

सोशल मीडियासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांवलीची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानसंबंधी नव्या नियमांनुसार सरकारला जी सोशल मीडिया पोस्ट आक्षेपार्ह वाटेल ती पोस्ट सरकारनं आदेश दिल्यानंतर 36 तासांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी हटवावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रविशंकर प्रसाद म्हणाले की, आता सोशल मीडियावर तीन स्तरांवर नजर ठेवली जाईल. कंपन्यांना तीन मुख्य अधिकारी तैनात करावे लागतील, जे सोशल मीडिया संबंधिच्या तक्रारी हाताळतील. केंद्रीय अनुपालन अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी आणि निवासी संपर्क अधिकारी हे भारतात असायला हवेत. त्यांची टीम 24X7 काम करेल.

Comments are closed.