संचार साथी’ ॲप विरोधात विरोधकांचा हल्लाबोल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. ३ : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DOT) सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारद्वारे विकसित करण्यात आलेले सायबर सिक्युरिटी ‘संचार साथी’ हे ॲप प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश सोमवारी (दि.१) दिले. या निर्णयावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली असून आता केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी यांनी “संचार साथी ॲपची सक्ती म्हणजे देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न” असे म्हणत या निर्णयाला आज (दि.२) विरोध केला आहे. खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, “संचार साथी हे ॲप म्हणजे थेट पाळत ठेवण्याचे साधन आहे आणि हे अगदीच हास्यास्पद आहे. प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा हक्क आहे. कुटुंबीयांना, मित्रांना मेसेज करण्यासाठी सरकारने प्रत्येक गोष्ट पाहावी, हा विचारही चुकीचा आहे.”
संचार साथी ॲपवर सुरु असलेल्या वादाबाबत ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “विरोधकांकडे मुद्दे नसतात, म्हणून ते कुठलेही मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर आम्ही काय करणार? आमची जबाबदारी आहे की, ग्राहकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित करणे. संचार साथी ॲप ग्राहकांना स्वतःची सुरक्षा वाढवण्याची सुविधा देते.
