Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशात कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासात १ लाख ४५ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून सक्रीय रुग्णांची  संख्या १०  लाखांवर गेली आहे. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १० एप्रिल: देशात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या चोवीस तासात देशात एक लाख ४५ हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर गेली आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या चोवीस तासात ७७,५६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने दर दिवशी एक लाखांचा टप्पा ओलांडल्याचं दिसत आहे. 

देशातील कोरोनाची स्थिती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • एकूण कोरोना रुग्ण संख्या – १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६
  • एकूण डिस्चार्ज- १ कोटी १९ लाख ९० हजार ८५९
  • एकूण सक्रीय रुग्ण – १० लाख ४६ हजार ६३१
  • एकूण मृत्यू- १ लाख ६८ हजार ४३६
  • एकूण लसीकरण- ९ कोटी ८० लाख ७५ हजार १६० डोस

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या :

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात शुक्रवारी ५८,९९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन ४५३९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २६,९५,१४८  रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण ५३४६०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.९६% झाले आहे. गुरूवारी ५६ हजार २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात शुक्रवारी ३०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं ५७,३२९ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर राज्यात  ५,३४,६०३ सक्रीय रुग्ण आहेत. तर राज्यात २,१६,३१,२५८ एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. 

दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात ७४३७ कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी ५५०६ रुग्णाची भर पडली होती. आतापर्यंत दिल्लीमध्ये ६,९८,००८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ११,१५७ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.