Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

NIA ला पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 08 जून :- राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एक कॉल आला आहे. कॉलरने असा दावा केला आहे, की देशात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. कॉलरने यावेळी 26/11  सारखा कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. सध्या एनआयएने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले आहे.

3 जून रोजी आलेल्या या कॉलवर या व्यक्तीनं माहिती दिली, की हल्ल्यासाठी स्टील बुलेट आणि IED नेपाळ आणि बांग्लादेशमार्गे तस्करी करून आणण्यात आलं आहे. कॉलरनं म्हटलं, की येत्या काही काळातच मोठा हल्ला होऊ शकतो. दावा केला जात आहे, की या दहशतवादी हल्ल्यासाठी 26/11 सारखाच कट रचला जात आहे. NIA कडे आलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दहशतवादी बर्‍याच दिवसांपासून देशाच्या विविध भागात हल्ल्याचे कट रचत होते, पण गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे ते कोणताही मोठा हल्ला करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएने पश्चिम बंगालमधील 6 दहशतवाद्यांसह अल कायदाच्या एकूण 9 कार्यकर्त्यांना अटक केली होती.

हे पण वाचा :- मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.