Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधान मोदींचा 11 डिसेंबरला महाराष्ट्र दौरा

प्रकल्पांचे करणार उद्धाटन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

30 नोव्हेंबर :-  गुजरात निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन केले जाणार आहे. ज्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारकडून मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रकल्पातील कमान कोसळून मोठा अपघात झाला होता. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळाली. मोदी येत्या 11 डिसेंबरला नागपूर मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्धाटन करणार आहेत. यातून मोदी महापालिका निवडणूकांपूर्वी नागपूरला दोन मोठे प्रकल्प गिफ्ट देणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.