Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लठ्ठपणा या वाढत्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांकडून देशभरातल्या १० व्यक्तींची निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. काल झालेल्या मन की बातच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यावर भर दिला. तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आणि लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वजण एकत्रितपणे छोट्या -छोट्या प्रयत्नांद्वारे या आव्हानाचा सामना करू शकतो, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

https://x.com/narendramodi/status/1893861168986673598

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लठ्ठपमा या समस्येचा तातडीनं सामना करण्यासाठी आणि याबाबत देशभरात जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरातल्या दहा व्यक्तींची निवड केली आहे. हे दहा सदिच्छा दूत आपल्या नियमितच्या आहारात कमीत कमी तेलाचा वापर करण्याविषयी जनजागृती करतील.

यामध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार सुधा मूर्ती, नेमबाज मनु भाकर, भारोत्तोलक मीराबाई चानू, उद्योगपती आनंद महिंद्रा, उद्योजक नंदन निलेकणी, अभिनेता मोहनलाल, अभिनेता निरहुआ हिंदुस्तानी, अभिनेता आर माधवन आणि गायिका श्रेया घोषाल यांचा समावेश आहे. यामुळे आता आगामी काळात आपल्याला देशभरात लठ्ठपणा विरोधी मोहिमेला वेग आल्याचं पाहायला मिळेल.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.