Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब! 33 वर्षे फक्त चहावर जगतायत पल्लीदेवी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

“चायवाली चाचीची प्रकुर्ति तंदुरुस्त असल्याने डॉक्टरही हैरान..

ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

छत्तीसगढ़ दि.10 जानेवारी :- सकाळची सुरवात पहिले चाय ने होते. नातेवाईक असो किंबहुना कुठलीही मित्रमंडळी एकत्र आली की सर्वात आधी चाय आवडीने घेतला जातो आणि चाय घेतच गप्पागोष्टी होत असतात. एवढेच क़ाय तर कुठून थकुन भागूंन आलो तर चाय फ्रेश वाटण्यासाठी आपण चहा घेत असतो. त्यामुळे सर्वांचा आवडता पेय असेल तर तो म्हणजे चाय आहे. जर कोणी व्यक्ती फक्त चहा वरच गेली 33 वर्ष केवळ चहावर जीवन जगताहेत असं तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ! होय पण हे खरे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील बदरिया गावच्या 44 वर्षीय पल्लीदेवी या गेली 33 वर्षांपासून केवळ चायवरच जीवन जगताहेत. इतक्या वर्षात त्यांच्या पोटात एकही अन्नाचा कण गेलेला नाही त्यांच्या या सवयीमुळे या परिसरातच याची चाय वाली चाची म्हणून परिसरात अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. चाची इतकी वर्ष चायवर राहून देखील त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याने डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.जेव्हा केव्हा डॉक्टर त्यांना विचारतात त्यावेळी चाची म्हणतात आपल्याला कधीच भूक लागत नाही. सकाळी आणि दिवस मावळल्यानंतर ही आपण काळा चहा पीत असल्याने पल्ली देवीने यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सहावीत असल्यापासून पल्ली देवी यांनी जेवण सोडले आहे. असे त्यांच्या वडिलांनी म्हणजे परशुराम यांनी सांगितले आहे. आणि त्यांच्ये लहान भाऊ म्हणतात मला जेव्हा पासून समज आलीे तेव्हापासून मी ताईला जेवताना कधीच पाहिले नाही असे त्यांच्या छोट्या भावाने ही सांगितले आहे.

छोट्याशा हट्टामुळे सोडले जेवण.

पल्ली देवी यांचे जेवण सोडण्यामागे देखील एक गमतीदार विषय झाला आहे. घरामध्ये दुध विक्रेत्याला पैसे देण्यासाठी उशीर झाल्याने त्यांनी कुटुंबीयांना खूप सुनावले. त्यामुळे नाराज झालेली आपली बहीण दुधाचा चाय पीने सोडले तेव्हापासून ती फक्त काळा चहा पिऊ लागली आणि ती तब्बल 33 वर्षांपासून त्यावरच असल्याचे त्यांचे भाऊ बिहारीलाल यांनी माहिती दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.