Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोनम वांगचूक यांनी भारतीय लष्करासाठी बनवले सौर उर्जेवर चालणारे तंबू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. २१ फेब्रुवारी: आमिर खानच्या ३ इडियट्स मधील फुनसुख वांगडू या व्यक्तिरेखेमागील प्रेरणास्थान असलेल्या सोनम वांगचूकने एक नवा आविष्कार केला आहे. या आविष्कारामुळे लडाखच्या -५० डिग्री तापमानात आपल्या सैनिकांना उबदार वातावरणात राहायला मदत होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोनम वांगचूकने सौर उर्जेवर चालणाऱ्या लष्करी तंबूचे फोटो शेअर केले. त्यांचे म्हणणे आहे की ते बाहेर -१ डिग्री तापमान असले तरी ते तंबूच्या आतले तापमान १५ डिग्री पर्यंत गरम ठेवू शकतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांनी पुढे हेहीद सांगितले की, अशा एका तंबूमध्ये भारतीय सैन्याचे १० जावं राहू शकतात. शिवाय हे सगळे तंबू पोर्टेबल आहेत, म्हणजेच या तंबूंची जागा सैन्याच्या सोईनुसार बदलता येऊ शकते.

सोनम वांगचुक यांच्या या अजून एका आविष्काराने सगळ्यांनाच अवाक केले आहे. वांगचुक यांचे कौतुक करताना उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी असे म्हटले आहे की, “सोनम मी तुझ्या कार्याला सलाम करतो आणि तुझे काम हे कायमच स्फूर्तिदायक राहिलेले आहे.” सोनम वांगचूक यांचा भारतीय वस्तू वापरण्यासाठी भारतीयांना साद घालणारा एक व्हिडिओसुद्धा पूर्वी व्हायरल झाला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.