Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रविवार दि १८ एप्रिल २०२१ रोजी होणा-या संघ लोकसेवा आयोगाच्या एन.डी.ए.व नौसेना अकादमी परिक्षेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १७ एप्रिल:- बृहन्मुंबई मधील 36 उपकेंद्रांवर रविवार दि.18 एप्रिल 2021 रोजी संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय रक्षा अकादमी व नौसेना अकादमी (1) परीक्षा 2021 ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या दि. 13 एप्रिल 2021 रोजी Break the Chain आदेशातील मुद्दा क्र. 9 (डी) व महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचेकडोल आदेश MCG/A/6202 यातील मुदा 1 नुसार उमेदवार व त्यांचेसोबत एक पालक यांना वैध प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षेला हजर राहणेसाठी प्रवास करणे व कोविङ-19 प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाणेसाठी मुभा देण्यात आली आहे.
यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.