Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. ४ एप्रिल: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता, त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेत्री शशिकला यांचा जन्म सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात झाला. यांचे बालपण ऐशोआरामात गेले. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल बनल्या. शशिकला यांना दोन मुलीही आहेत. १९४७ च्या जुगनू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली आरती चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून या भूमिकेसाठी तयार केले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.