Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तुफान गर्दी

गुजरातमधील कच्छ येथे धार्मिक मुस्लीम नेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहमदाबाद, 09 मे:– देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे, गुजरातमधून  चिंता वाढविणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत. शनिवारी गुजरातमधील कच्छ येथे धार्मिक मुस्लीम नेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अंत्यसंस्कारासाठी एकत्र आलेल्या या लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी होती आणि लोकांनी मास्क घातले नव्हते आणि सुरक्षित अंतर तर अजिबात पाळले गेले नसल्याचे दिसत आहे.

देशात आणि गुजरातमध्येही कोरोना स्थिती गंभीर असताना अशा प्रकारची गर्दी कशी काय जमली? असा प्रश्न निर्माण होत आहे. गुजरातमधील कच्छच्या मांडवी येथे ही मोठी गर्दी झाली होती. एका मुस्लीम धर्मगुरूचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जनाजेसाठी लोक एकत्र आले होते. येथील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान, पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून जनाजेमधील एक व्हिडिओ तेथीलच असल्याची खात्री केली आहे. रात्री उशिरा मुस्लीम धर्मगुरूंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कारासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते, असे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

http://https://twitter.com/dave_janak/status/1391061474408161285?s=20

97 वर्षीय हाजी अहमद शाह यांची प्रकृती काही दिवसांपासून खराब असल्याचे सांगण्यात येत होते. अशा परिस्थितीत रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. तर 10 दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. महत्त्वाचे म्हणजे हजरत हाजी अहमद शाह बाबा बुखारी मुफ्ती यांनी मुस्लीम समाजात शिक्षणामध्ये जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.