Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

67- आरमोरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024

जिल्हाधिकारी यांचेकडून मतदान मोजणी कक्षाची पहाणी व मतमोजणी पुर्वतयारीचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

देसाईगंज :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, आरमोरी रोड देसाईगंज येथे मतदान मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता करण्यात आलेल्या पुर्वतयारीबाबत मा.जिल्हाधिकारी संजय दैने (भा.प्र.से.) यांनी मतमोजणी कक्षास भेट देऊन पहाणी करुन काही महत्वाचे निर्देश दिले.

यावेळी मा.मानसी (भा.प्र.से.) निवडणूक निर्णय अधिकारी 67-आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी माहिती दिली की, मतमोजणी कामाकरीता एकुण 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली असुन त्यावर मतमोजणी पर्यवेक्षक,सहायक,सुक्ष्म् निरीक्षक यांची व रो-ऑफीसरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोस्टल मतदानाची मोजणी करण्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदरची कामे योग्य पध्दतीने पार पाडण्याचे दृष्टीने विविध प्रकारची 22 पथके तयार करण्यात आलेली असुन त्यांना पुर्वनियोजन करण्याबाबतच्या आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याचे सांगून, मतमोजणी कक्षात आवश्यक सोयी सुविधांची जवळपास तयारी पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भेटी वेळी मा.रणजीत यादव (भा.प्र.से.) उपविभागीय अधिकारी कुरखेडा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मा.प्रशांत गड्डम, मा. प्रिती डुडूलकर व मा.उषा चौधरी, कुरखेडाचे तहसिलदार रमेश कुंभरे, नायब तहसिलदार विलास तुपट,एस.जी. अनमदवार तसेच ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.