Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात १६ नोव्हेंबर २०२४ रोजी संधिवात ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संधिवाताच्या आजाराची अनेक लक्षणे आहेत जसे -सांधे, स्नायू, हाडे यांच्या आसपास वेदना, सूज आणि/किंवा कडकपणा, मान आणि पाठदुखी, प्रदीर्घ ताप, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, वारंवार तोंडात फोड येणे, केस गळणे, प्रकाश संवेदनशीलता. हात, पाय, चेहरा, छाती किंवा पोटावर त्वचा घट्ट होणे. डोळे आणि तोंड कोरडे पडणे, थंड स्थितीत बोटे/ हाताचे पंजे निळे किंवा पांढरे होणे, जिने चढल्याने स्नायू कमकुवत होणे. संधिवात ओपीडी दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी नियोजित असून, संधिवात विकारतज्ञ डॉ. सलिल गाणू यांच्याकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे, प्रयोगशाळा तपासणी, २डी इको व टी.एम.टी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. तरी शनिवार दिनांक- १६ नोव्हेंबर रोजी होणार्या संधिवात ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.

Comments are closed.