Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी:पुदुच्चेरीत काँग्रेसला मोठा धक्का व्ही.नारायनस्वामी सरकारने विश्वासमत गमावलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था:22फेब्रुवारी

पुदुच्चेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुदुच्चेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणस्वामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. दरम्यान व्ही नारायणस्वामी यांनी पुदुच्चेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.