Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता स्पर्धा परिक्षा

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ जानेवारी २०२५

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,  दि.२८ : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वीत एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मधील इयत्ता ६ वीचे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता ७ ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हापरीषद, नगरपालिका, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांत इयत्ता ५ वी तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीचे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती/ आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दु. १ या वेळेत तसेच इयत्ता ७ वी ते ९ वीचे विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दु. २ या वेळात नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर 1) एकलव्य निवासी शाळा चामोर्शी (स्थित- शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली) 2) एकलव्य निवासी शाळा, कोरची या केंद्रावर नियोजीत वेळेत स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्गात शिकत असलेले परंतू ज्या पालकांचे वार्षीक उत्पन्न रुपये सहा लाख पेक्षा कमी आहे. अशाच पालकांचे अनुसूचित / आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परिक्षेस बसण्यास पात्र राहतील.

परीक्षे बाबतचे प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तसेच नजिकच्या शासकीय, अनुदानित आश्रम शाळेत उपलब्ध होतील व स्विकारले जातील. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दिनांक २५ जानेवारी २०२५ राहील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे अर्ज सादर करावे, असे आवाहन गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.

Comments are closed.