जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, पारा घसरण्यास सुरुवात.
मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जाणवू लागला थंडीचा गारवा .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : देशात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे वर्षाला तीन ऋतू येतात, पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्याची गोड सुरूवात झाली. पावसाला संपून हिवाळ्याला सुरुवात झाली असून, नागरिकांना गारव्याचा अनुभव येऊ लागला आहे. मागील आठवडाभरापासून किमान तापमानात दिवसागणिक घसरण होत आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढू लागला आहे, गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता जाणवत असली तरी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत थंडीचा गारवा जाणवू लागला आहे . यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने थंडीचा जोर वाढण्याची शक्यता केली जात आहे. साधारणतः ऑक्टोबरपासूनच थंडीची सुरुवात होते. परंतु यावर्षी नोव्हेंबर महिन्च्यायाच्या सुरुवातीपासून थंडीला सुरुवात झाली आहे. आता रात्रीच्या सुमारास थंडीचा जोर असला तरी कडाक्याची थंडीसाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
हिवाळयामध्ये दिवस हळूहळू लहान होत असून आणि रात्र मोठी-मोठी होत जात आहे . त्यामुळे रब्बी पिकाच्च्या तयारीला सुरुवात होत आहे. शेतातील धान पिकाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या मशागतीची कामे सुरू केली. तसेच शेतशिवारात रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरु झालेली आहे. रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. थंडीमुळे खरीप हंगामात लागवड केलेल्या तुरीच्या पिकाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेदिवस वाढत जाणारी थंडी रब्बी हंगामातील विविध कडधान्य पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
हे हि वाचा :-
Comments are closed.