निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून मतदान केंद्रातील सोयीसुविधांची पाहणी धानोरा व चातगाव येथील सहा मतदान केंद्रांना भेटी
एफ.एस.टी. पथकासोबत एसटी बस मध्ये तपासणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 13 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रावर असलेल्या किमान मुलभूत सुविधांची निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांनी पाहणी केली. आज त्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तालुक्यातील 5 व चातगाव येथील एक अशा सहा मतदान केंद्रांना भेटी दिल्या व मतदान केंद्रावर आवश्यक बाबींसदर्भात संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी धानोरा येथील एफ.एस.टी. पथकासोबत एसटी बस मध्ये तपासणी केली. तसेच शिवाजी हायस्कूल गडचिरोली येथील निवडणूक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.
Comments are closed.