Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुप्तधन शोधण्याच्या मोहापायी पत्नीचा देणार होता बळी; पती व सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील संतापजनक घटना,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. १२ जून :  राज्यात २०१३ साली जादूटोणा कायदा लागु झाला. मात्र कायद्याची धाक नसल्याने चिड आणणारे प्रकार घडत आहे. अशाच काही प्रकार यवतमाळच्या पांढरकवडा जवळ असलेल्या केळापूर मध्ये उघडकीस आला. २१ व्या शतकातही गुप्तधनासाठी अघोरी विद्येद्वारे अंधश्रद्धेतुन असे प्रकार घडत आहे. केळापूर येथी इसमाने आपल्याच पत्नीचा गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.

दहा वर्षापूर्वी केळापूर येथील प्रवीण गोविंदराव शेगर यांच्या सोबत लग्न झाला. लग्नानंतर एक ते दिड वर्ष पिडीतेला सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक देण्यात आली.परंतू तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान च्या काळात तिच्या पतीला व सासरच्या मंडळीला गुप्तधन शोधण्याचे वेड लागले.  अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढण्याचा मोहात पतीसह सासरच्या मंडळीने अनेक वेळा पीडितेवर मांत्रिक प्रयोग केला.

विशेष म्हणजे गुप्तधनासाठी सुनेचा नरबळी देण्याचा हट्ट पतीसह सासरच्या मंडळीनी धरला होता. मात्र पिडीत महिला याला नकार देत असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्या जात असल्याने पिडीतेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुप्तधन शोधण्याचा वेडापायी पिडीतेला अंगारा लावणे,लिंबू,हार टाकणे,माणसाची कवटी तिच्या गळ्यात टाकणे तसेच जडीबुटीचे औषध देऊन तिला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पिडीतेने पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे कथन केला. या प्रकाराला विरोध केला असता तिला अधिकच त्रास दिला जात होता.

पोलीसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य,प्रतिबंध व निर्मूलन आणि काळा जादू,हुंडाबंदी कायद्या अंतर्गत सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान घटनेतील सहा ही आरोपी फरार झाले आहे.

हे देखील वाचा : 

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

महाराष्ट्र – राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2022 निकाल जाहीर

 

 

Comments are closed.