Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज ऑफलाईन सादर करण्यास 30 नोव्हेंबर ची मुदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.14: मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरुनही अर्ज ऑटोरिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहीत वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरुनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येत होत्या. त्यामुळे सन २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी करण्यास अथवा नोंदणीकृत अर्ज मंजूर होण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती ऑफलाईन पध्दतीने मंजुर करुन मान्यता देण्यात आली आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांचे उपरोक्त कारणांन्वये शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी त्यांच्या महाविद्यालयांमार्फत शिष्यवृत्ती / फ्रिशीप करीता ऑफलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली या कार्यालयास सादर करावे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. ऑफीस रोड, आय.टी.आय मागे गडचिरोली, दुरध्वनी क्र. 07132-222192Email id: [email protected] वर संपर्क साधावा. मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जांना शासनाकडून मंजूरी देण्यात येणार नसल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.