Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 वर एक दिवसीय कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात दि. ३० डिसेंबर रोजी PM USHA-MERU कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क-NEP 2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा हायब्रीड पद्धतीने घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय कविश्वर, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा, राष्ट्रसंत तुकाराम महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉ. मनीष उत्तरवार, संचालक, ननवसा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे होते.
प्रमुख वक्ते डॉ. संजय कविश्वर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत आणलेले राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क भारताच्या शिक्षण व्यवस्थेत एक नवीन आयाम आणत आहे. हे फ्रेमवर्क शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर एकात्मिक क्रेडिट प्रणाली स्थापित करते. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार विविध विषयांचा अभ्यास करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल. विद्यार्थी केवळ वर्गांमध्येच नव्हे तर प्रकल्प, इंटर्नशिप आणि सामाजिक सेवा यासारख्या विविध क्रियाकलापांद्वारे क्रेडिट मिळवू शकतात. हे फ्रेमवर्क आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत क्रेडिट सिस्टीमशी सुसंगत आहे. NEP 2020 चा हा महत्त्वाचा घटक शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित आणि लवचिक बनविण्यात मदत करेल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता विकसित करण्यात आणि त्यांच्या करिअरची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे होते. कार्यक्रमाच्या आयोजनात गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरू महोदय डॉ.प्रशांत बोकारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ.धनराज पाटील यांनी प्रस्ताविक केले. व्यासपीठावर डॉ. प्रितेश जाधव, समन्वयक, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.सविता गोविंदवार यांनी केले. वक्ते डॉ.संजय कविश्वर यांचा परिचय डॉ.मनीष देशपांडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.धैर्यशील खामकर यांनी केले.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हयात ७५ अधिकृत सावकार,

बंधाऱ्यामुळे जमीन येणार ओलिताखाली

 

आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज -संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

 

Comments are closed.