विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना विजयाचा विश्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विधानसभा निवडणूक- २०२४ मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी व शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती होत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या ५० ते ६० जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे की, मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, असा मोठा दावाही शरद पवारांनी केला. असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर हा खोचक निशाणा साधला आहे. माझ्यासोबत २ ते ३ वेळा झालंय.‘जे लोक पक्ष सोडून गेलेत ते पुन्हा कधी निवडून आलेच नाहीत. लोक निवडून येतात आणि पक्ष सोडून जातात. जे सोडून गेले निवडून आले एका विचारावर आणि नंतर सोडून गेले हे लोकांना पसंत पडत नाही. असं स्पष्टपणे शरद पवार म्हणाले तर यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालात ५० ते ६० उमेदवार निवडून येतील असा शरद पवारांनी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
Comments are closed.