Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अजित पवार गटाला स्वतंत्र पक्ष म्हणुन लढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

शरद पवारांचे फोटो वापरण्यास मनाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक  येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे.  त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला मोठा झटका दिला आहे.  निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असे निर्देश अजित पवार गटाला देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाप्रकरणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो वापरु नका, असे निर्देश दिले आहे. तसचे विधानसभेत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा, असेही आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.