Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

तेंदुपत्ता संकलन करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने केला हल्ला...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि १४ : शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये आज वाघाने केलेल्या हल्ल्यात ६४ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना आज दि,१४ मे सकाळी ७:३० वाजता च्या दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल ( ६४ ) रा.आंबेशिवणी येथील रहिवासी आहेत.

जिल्हाभरात सध्या तेंदू पत्ता संकलनाचे काम सुरू असून जवळपास एक हप्ता चालणाऱ्या या तेंदूपत्ता संकलनासाठी हजारो मजूर, शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगल परिसरामध्ये तेंदुपत्ता संकलन करीत असतात. कारण ही तसेच आहे या तेदुपत्ता संकलनातून शेतीसाठी लागणारा खर्च व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी लागणारा खर्च तेंदूपत्ता संकलातून जवळपास पूर्ण होवू शकतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे सकाळीच उठून तेंडू पत्ता संकलन करण्यासाठी जात असतात. सदर मृतक महिला हि गावातील सहकार्यासोबत तेंदू पत्ता संकलन करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने मृतक महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले आहे. घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच गडचिरोली वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम मौजा आंबेशिवणी येथील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये दाखल होऊन घटनेचा पंचनामा व पुढील कारवाई करत आहे.

या घटनेमुळे परिसरात पुन्हा वाघाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.तर  सदर प्रकरणाची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी. अशी मागणी जोर धरू लागली असून नरभक्षक वाघाचा तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ही जोर धरू लागली असून जनतेत वन विभागाच्या कार्यशून्य नियोजनाने पुन्हा एकदा  वाघाने महिलेचा जीव घेतल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्या प्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनास्थळी वन विभाग व पोलीस विभागाचे कर्मचारी मोका पंचनामा करून मृत महिलेचे शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

 

Comments are closed.